ऋण

ऋण

आई आई म्हणून मी कर्तृत्ववान

आई म्हणजे आयुष्यातला गुलमोहर


सदा बहरलेला प्रेमाचा तो शिडकावा

कधीही राग न धरणारी


माझी काळजी तिच्या डोळ्यात न मावणारी

म्हणून तिच्या वार्धक्यात


पंगू झालेल्या तिच्या शरीराला

मी माझ्या मनात बांधला तिच्यासाठी


सुंदर असा प्रेमस्वरूपी पाळणा आणि अखेरपर्यंत

जोजविन त्याला माझा श्वास असेपर्यंत


तिचा प्रत्येक शब्द झेलीन फुलासारखा

आणि तिच्यामुळे लाभलेल्या या श्रीमंतीत


प्रत्येक क्षण असेन माझा तिच्या

सहवासासाठी एक अद्भुत सोहळा


असेल ती नसेल ती पण प्रत्येक क्षण

तिच्या आनंदासाठी सदैव तत्पर असेन मी

Let's Get Connected

Related posts

One Thought to “ऋण”

  1. Apurva Shimpi

    khupach sundar

Leave a Comment