गुंता

web-25959_630x210गुंता

कॉलेजचा पहिला दिवस, पहिला तास , समोर शिक्षक उभे आणि  मी हा विचार करत बसलो की,उरलेले  शेवटचे 6 महिने किती अवघड जातील. किती गुंत्लोय मी माज्या कॉलेज लाइफ मधे?,हा विचार सतत त्रास देऊ लागला. मग गुंता हा शब्द आठवला, लगेच तो मी हातावर लिहला आणि ठरवले की यावर काहितरी लिहू.
“गुंता”, काय असतो हां  गुंता हे सगळ्याना माहित आहे. लहानपण हे मुलांनी मांजाचा गुंता सोडवण्यात आणि मुलींनी शिवणकाम करताना धाग्याचा झालेला गुंता सोडवताना व्यतित केला. लहानपणी हे असले छोटेसे गुंते सोडवताना कधी ते सहज सुटायचे तर कधी आपली खूप फजिती व्हायची. लहानाचे मोठे झालो तसे तसे बऱ्याच गोष्टी एकमेकांत गुंतत गेल्या. इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षी समजले की आपल्याला यात किती रस आहे. असली बाब बहुतेक विद्यार्थीं सोबत घडते. विनाकारण आपण यात गूर्फट्लो गेलो. मला ही असले विचार त्रस्त करायचे, अश्या वेळी ओढ लागते एका व्यक्तिची.
ती व्यक्ति कॉलेज मधे असते . दुसऱ्या किवा आपल्या डिपार्टमेंटला . बी.ई ला आलो की परत सहवास वाढतो , आपुलकी निर्माण होते आणि हळु हळु ती आवड म्हणून मनात रुजू लागते. तिने मनात कधी एक कायमची जागा निर्माण केली हे समजत नाही. तिच्याही मनात आपल्याला एक स्थान आहे हे जाणून खूप आनंद होतो. जग जिँक्ल्यासार्खे वाटू लागते . आयुष्यात पहिली अशी मुलगी बघतो जिने इंग्लीशची एक म्हण सार्थक केली असते ती म्हणजे ” beauty with brains “.
पण म्हणतात न की चांगल्या सवयी आणि चांगली व्यक्तिचा सहवास जास्त काळ लाभतच नही. प्रेमाने गोंजर्ले ते नात्याचे धागे विस्कटू लागता . त्रास होतो पण यातून उजर्णेही तितकेच महत्वाचे असते म्हणून त्या दिशेने विचार वाटचाल करू लागतात .
किती सोपे असते एखाद्या व्यक्ति मधे गुंतने?,आणि नंतर प्रेम भंग झाला की हां गुंता सुटत नाही. आपण यात जेव्हा पडतो तेव्हा असे वाटते की हां गुंता कधीच सुटू नये आणि आयुष्यभर हां गुंता समजून घेण्यात व्यक्त करावे. आपल्याला वाटते की आपण हां गुंता सोडवतोय पण नकळत तो सूटाय ऐवजी आपण त्यात गाठ बनवत जातॊ.
मी म्हणतो आयुष्य सोपे जगां,त्याचा गुंता करू नका
निष्पन्न काहीच नाही निघत फक्त चिन्ता वाढते.
आपली मतं दुसर्यावर लादल्यामुळे नाती नाहीशी होतात,म्हणून आयुष्याची काही प्रश्नांची उत्तर ती सोडून दिल्यावर भेटतात. नात्यांच्या या गर्दीत ज्याला एकटे जगता येईल तोच टिकेल.
         धन्यवाद

Related posts

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of