तुझी साथ

तुझी साथ

तुझा चुकलं

माझच… चुकलं


असं म्हणण्यापेक्षा

आपलं चुकलंच …


असं म्हटलं असतं तर,

आपलं जीवन सावरलं गेलं असतं


तुझं एक चुकलं

मी म्हणाले, ‘नाही दहा वेळा चुकलं’


हे गणित मांडण्यापेक्षा

दोघांच्या चुका झाल्यात

असं मानलं असतं तर,


आपण आणखी जवळ येऊ शकलो असतो

ह्या जर तर च्या विचारात


आज दिसतंय मला

काटेरी कुंपणात घेरलेले आपले कौलारू घर


तिथल्या खिडकीत कोळीनं जाळ विणुन सांगितलं मला

घर असतं दोघांचं


सुख-दुःखाच्या भावनांनी एकमेकांना जाणायचं

आज वयाची साठी उलटल्यानंतर जाणवतंय मला


माझ्या थरथरणाऱ्या हातांना हवी होती तुझी साथ

खरंच हवी होती फक्त तुझी साथ…..

Related posts

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of