बाप होणे अवघड असते

बाप होणे अवघड असते

 

अभिमान आहे मला माझ्या बापाचा

मनात माझ्या आहे मान त्याला राजाचा

होऊ दिला नाही कधी स्पर्श निराशेचा

भास होतो सतत त्याला त्याच्या बालपणाचा

बालपण त्याचं हरवून गेलं

परिस्थितीच्या लाटेत वाहून गेलं

बघितले त्याने फक्त दुःख आणि कष्ट

नाती गॊतींनी केले त्याला दुर्लक्ष

वय वाढलं त्याचं फक्त झटण्यात

आई भावांची गरज भागविण्यात

विचार नाही स्वतःचा कधीच

विचार करायला वेळही नाहीच

स्वप्न आमचे पण कष्ट त्याचे

व्रण आमचे तर अश्रू त्याचे

सतत धडपड करे आमच्यासाठी

इच्छा नाही कसली स्वतःसाठी

शून्यातून त्याने जग उभारले

त्रास साहून आनंद पसरवले

उपकार त्याचे फेडणे अशक्य आहे

पण प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे

त्याला बघून एवढेच कळते

माणूस बनणे कसे असते

मुल होणे हे भाग्य असते

पण बाप होणे फार अवघड असते …..

Let's Get Connected

Related posts

3 Thoughts to “बाप होणे अवघड असते”

  1. Chetan Bagul

    yaala mhantat “DARJAA”

  2. Apurva Shimpi

    Tears rolled down my cheeks. You’ve organised your thoughts so well that it reflects the respect you have for your father. Awesomesauce!

  3. prabhakar

    खूप छान आह़े मी भाराऊन गेलो

Leave a Comment