ऋण

ऋण आई आई म्हणून मी कर्तृत्ववान आई म्हणजे आयुष्यातला गुलमोहर सदा बहरलेला प्रेमाचा तो शिडकावा कधीही राग न धरणारी माझी काळजी तिच्या डोळ्यात न मावणारी म्हणून तिच्या वार्धक्यात पंगू झालेल्या तिच्या शरीराला मी माझ्या मनात बांधला तिच्यासाठी सुंदर असा प्रेमस्वरूपी पाळणा आणि अखेरपर्यंत जोजविन त्याला माझा श्वास असेपर्यंत तिचा प्रत्येक शब्द झेलीन फुलासारखा आणि तिच्यामुळे लाभलेल्या या श्रीमंतीत प्रत्येक क्षण असेन माझा तिच्या सहवासासाठी एक अद्भुत सोहळा असेल ती नसेल ती पण प्रत्येक क्षण तिच्या आनंदासाठी सदैव तत्पर असेन मी

Read More

तुझी साथ

तुझी साथ तुझा चुकलं माझच… चुकलं असं म्हणण्यापेक्षा आपलं चुकलंच … असं म्हटलं असतं तर, आपलं जीवन सावरलं गेलं असतं तुझं एक चुकलं मी म्हणाले, ‘नाही दहा वेळा चुकलं’ हे गणित मांडण्यापेक्षा दोघांच्या चुका झाल्यात असं मानलं असतं तर, आपण आणखी जवळ येऊ शकलो असतो ह्या जर तर च्या विचारात आज दिसतंय मला काटेरी कुंपणात घेरलेले आपले कौलारू घर तिथल्या खिडकीत कोळीनं जाळ विणुन सांगितलं मला घर असतं दोघांचं सुख-दुःखाच्या भावनांनी एकमेकांना जाणायचं आज वयाची साठी उलटल्यानंतर जाणवतंय मला माझ्या थरथरणाऱ्या हातांना हवी होती तुझी साथ खरंच हवी होती फक्त…

Read More