बाप होणे अवघड असते

बाप होणे अवघड असते   अभिमान आहे मला माझ्या बापाचा मनात माझ्या आहे मान त्याला राजाचा होऊ दिला नाही कधी स्पर्श निराशेचा भास होतो सतत त्याला त्याच्या बालपणाचा बालपण त्याचं हरवून गेलं परिस्थितीच्या लाटेत वाहून गेलं बघितले त्याने फक्त दुःख आणि कष्ट नाती गॊतींनी केले त्याला दुर्लक्ष वय वाढलं त्याचं फक्त झटण्यात आई भावांची गरज भागविण्यात विचार नाही स्वतःचा कधीच विचार करायला वेळही नाहीच स्वप्न आमचे पण कष्ट त्याचे व्रण आमचे तर अश्रू त्याचे सतत धडपड करे आमच्यासाठी इच्छा नाही कसली स्वतःसाठी शून्यातून त्याने जग उभारले त्रास साहून आनंद पसरवले…

Read More

कथा तरुणीची

कथा तरुणीची   आभाळ होते निळेभोर हिरवळ होती जमिनीवर त्या हिरवळीवर एक सुंदर कळी होती बागडत खेळत करत होती हळूहळू उमलण्याचा प्रयत्न पण व्यर्थ ! उमलण्या आधीच एका क्षुद्राने तोडून नेली घरात इथं तिथं नाचवली बिचारी कळी कोमेजून गेली कोमेजलेली कळी बघून क्षुद्राने तोडून फेकून दिली सांगायला लाज वाटते खरंच सांगायला लाज वाटते ती कळी म्हणजे एक तरुणी होती हो तरुणीच होती ती …..

Read More

ऋण

ऋण आई आई म्हणून मी कर्तृत्ववान आई म्हणजे आयुष्यातला गुलमोहर सदा बहरलेला प्रेमाचा तो शिडकावा कधीही राग न धरणारी माझी काळजी तिच्या डोळ्यात न मावणारी म्हणून तिच्या वार्धक्यात पंगू झालेल्या तिच्या शरीराला मी माझ्या मनात बांधला तिच्यासाठी सुंदर असा प्रेमस्वरूपी पाळणा आणि अखेरपर्यंत जोजविन त्याला माझा श्वास असेपर्यंत तिचा प्रत्येक शब्द झेलीन फुलासारखा आणि तिच्यामुळे लाभलेल्या या श्रीमंतीत प्रत्येक क्षण असेन माझा तिच्या सहवासासाठी एक अद्भुत सोहळा असेल ती नसेल ती पण प्रत्येक क्षण तिच्या आनंदासाठी सदैव तत्पर असेन मी

Read More

तुझी साथ

तुझी साथ तुझा चुकलं माझच… चुकलं असं म्हणण्यापेक्षा आपलं चुकलंच … असं म्हटलं असतं तर, आपलं जीवन सावरलं गेलं असतं तुझं एक चुकलं मी म्हणाले, ‘नाही दहा वेळा चुकलं’ हे गणित मांडण्यापेक्षा दोघांच्या चुका झाल्यात असं मानलं असतं तर, आपण आणखी जवळ येऊ शकलो असतो ह्या जर तर च्या विचारात आज दिसतंय मला काटेरी कुंपणात घेरलेले आपले कौलारू घर तिथल्या खिडकीत कोळीनं जाळ विणुन सांगितलं मला घर असतं दोघांचं सुख-दुःखाच्या भावनांनी एकमेकांना जाणायचं आज वयाची साठी उलटल्यानंतर जाणवतंय मला माझ्या थरथरणाऱ्या हातांना हवी होती तुझी साथ खरंच हवी होती फक्त…

Read More