Save Girl child

Sujata M Matale (2)आपल्या समाजाचे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे स्ञी आणि पुरुष. पुरातन काळापासून सर्व धर्मांमध्ये स्ञीयांना महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आपल्या पुरुष प्रधान देशात सुद्धा स्ञीयांना नेहमीच स्वकर्तृवाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केलय.
पण आजची सामाजिक स्थिति काहीतरी एक वेगळीच कथा सांगते. ज्या घरात देवीच्या मूर्तिची स्थापना केली जाते, त्याच घरात आज एका चिमुकल्या मूर्तिचं विसर्जन होतं. आज अशी वेळ आलीये की एक मुलगी किंवा स्ञी तिच्या स्वताच्या घरातही सुरक्षित नाहीये. समाजाची अशी अवस्था बघून काळजाला चटका लागतो.
आपण बातम्यांमध्ये बघतो बलात्कार व छेडछाड अशा घटनांच प्रणाम किती वाढत आहे. 16 Dec 2012 च्या घटनेनी या विषयाकडे पूर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेतले. त्यामूळे आजच्या घडीला महिलांच्या हक्कांविषयी मोठ्या प्रमाणावर जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. मुलगी झाली प्रगति झाली – असं म्हणणाऱ्यांची समाजाला उणीव भासत आहे. जिकडे बघाव तिकडे लोकांना “घराण्याचा वारस” हवा असतो. गर्भ लिंग निदान चाचणी करून बेकायदेशीर पणे गर्भात असलेल्या बाळाचे लिंग समझते आणि ती मुलगी आहे हे समझल्यावर तिला जगण्याचाही हक्क नाही मिळत.
इश्वरानी माणसाची रचना समाज घडवण्यासाठी केली. मानुसकी, आपुलकी, प्रेम, त्याग, मोह अशा बऱ्याच सकारात्मक भावना माणसात निर्माण केल्या. पण स्वार्थ, इर्ष्या, गर्व, क्रृता अशा भावनांनी अनेक समस्या उदभवल्या ज्याचे एक उदाहरण म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार व स्ञीभृण हत्या. आपल्या सर्वांचे अर्धदैवत व महाराष्ट्राला स्वराज्य मिळून देणारे छञपती शिवाजी महाराज, हे देखिल एका वघीणीने घडविले आणि त्या म्हणजे राज माता जिजाऊ.
इतिहासा पासून तर आज पर्यंत समाजातील स्ञीयांचे योगदान अमुल्य व अतुलनीय आहे हे विसरता कामा नाही.

Sujata Matale

Related posts

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of